या नव्या मराठी मालिकेत आहेत हे कलाकार, लॉकडाउनमध्ये घरातूनच केलं चित्रीकरण

By  
on  

लॉकडाउनमुळे सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरणही बंद आहेत. त्यामुळे टेलिव्हीजनवरही जुन्या मालिका किंवा जुने एपिसोड पाहायला मिळत आहेत. त्यातच सोनी मराठी वाहिनीवर एक वेगळाच इतिहास रचला जातोय. टेलिव्हीजन विश्वात पहिल्यांदाच सगळे कलाकार घरात बसून चित्रीकरण करत मालिका करत आहेत. ‘आठशे खिडक्या नऊशे’ दारं असं या मालिकेचं नाव असून श्रीरंग गोडबोले या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेचे  विविध प्रोमो सध्या प्रदर्शित होत आहेत. आणि आता आणखी एक चेहरा या  प्रोमोमध्ये दिसत आहे. अभिनेत्री अमृता देशमुख सध्या या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसतये. तिची ही या मालिकेत महत्त्वाची भूमिका आहे. अमृता याआधीही बऱ्याच मालिकांमध्ये दिसली होती. या मालिकेत अमृता सारा नावाची भूमिका साकारतेय.

याशिवाय या मालिकेत लिना भागवत, मंगेश कदम, समीर चौगुले, नेहा जोशी, सुव्रत जोशी, सखी गोखले, आनंद इंगळे, पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि इतर कलाकार आहेत. तेव्हा घरी बसलेल्या प्रेक्षकांसाठी घरी बसलेल्या कलाकारांनी केलेली ही नवी मराठी मालिका येत्या 18 मे पासून प्रदर्शित होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When you don’t like a particular filter • • #लेगैलेगै

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta) on

 

Recommended

Loading...
Share