By  
on  

तांत्रिक अडचणीमुळे मराठी 'रामायण'चं प्रसारण ढकललं पुढे

‘रामायण’ या पौराणिक मालिकेविषयीचं प्रेम हे आजही कायम आहे. आजही ही मालिका तितक्याच निष्ठेने पाहिली जाते याचं ताजं उदाहरण लॉकडाउनमध्ये पाहायला मिळालं. लॉकडाउनच्या काळात ही मालिका जेव्हा पुन्हा प्रसारित केली गेली तेव्हा प्रेक्षकांचा उदंड असा प्रसिसाद मिळाला. एवढच नाही तर लॉकडाउनच्या काळात सर्वात पाहिली गेलेली मालिका म्हणून जगभरात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली. 

लॉकडाउनच्या काळात ही मालिका डीडी वाहिनीवर प्रसारित केली गेली होती. त्यातच ही मालिका मराठीतून घेऊन येण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला होता. येत्या 1  जूनपासून ही मालिका मराठीत प्रसारित होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे याचं प्रसारण आता वाहिनीने पुढे ढकललं आहे. रामानंद सागर यांची ही मूळ हिंदीत असलेली मालिका त्या काळात मराठीतही डब झाल्याचं बोललं गेलं होतं. मात्र याविषयीची कोणतीच माहिती वाहिनीकडून आलेली  नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील ‘रामायण’ प्रसारणासाठी विलंब होत असला तरी जेव्हा ही रामायण या वाहिनीवर मराठीत प्रसारित होईल तेव्हा मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी ही नक्कीच मनोरंजनासह या मालिकेविषयी असलेल्या श्रध्देपोटी ते मराठी रामायणलाही उत्फुर्त प्रतिसाद देतील यात शंका नाही.
 

Recommended

PeepingMoon Exclusive