'बाळूमामा' साकारलेल्या या अभिनेत्याने लुकटेस्टसाठी पाठवले होते हे फोटो

By  
on  

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मराठी मालिका प्रचंड प्रसिद्ध झाली. प्रेक्षक न चुकवता ही मालिका पाहू लागले. या मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेच्या कामाचही कौतुक झालं. मात्र लॉकडाउन दरम्यान सुमीत त्याचं काम मिस करतोय. शिवाय सोशल मिडीयावर त्याचे थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. 

या थ्रोबॅक फोटोंमध्ये सुमीतने काही खास पोस्टही केल्या आहेत. त्याने त्याच्या लुकटेस्टचं फोटोशूट पोस्ट केलं आहे.. या पोस्टमध्ये सुमीत म्हणतो की, "आम्हाला ते दिवस लक्षात नाहीत पण ते क्षण लक्षात आहेत. मला आठवतय की लुक टेस्टसाठी काही फोटो पाठवायचे होते. तेव्हा माझ्या मित्राने हे फोटो क्लिक केले होते."

 

करियरमधील लुकटेस्टची ही आठवण सुमीतने शेयर केली आहे. स्ट्रगलचा काळ आणि ते क्षण प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचे असतात. ते लक्षात ठेवूनच पुढचा मार्ग कलाकार गाठत असतो. सुमीतनेही या सुरुवातीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.

Recommended

Loading...
Share