By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, कलाकार सेटवर घेत आहेत काळजी

लॉकडाउनच्या काळात टेलिव्हिजनवर मालिकांचे जुने भाग आणि काही जुन्या प्रसिद्ध मालिका पाहायला मिळत आहेत. मात्र लवकरच प्रसिध्द मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचं कारण असं की काही मालिकांच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर मालिका कलाकार सेटवर रुजू झाले असून चित्रीकरण करत आहेत.

 

'तुझ्यात जीव रंगला' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचे नवे भाग कधी पाहायला मिळतील यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. त्यातच या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच कोल्हापुरात पुन्हा सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने यावेळी सेटवर कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठक बाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधरसह इतर कलाकार आणि क्रू टीम उपस्थित होती. यावेळी सरकारने दिलेल्या नियमांनूसार काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहेत.

मास्क, सॅनिटायझरसह इतर सगळ्या गोष्टींचा वापर करून सुरक्षित अंतर पाळून हे चित्रीकरण सुरु करण्यात आलं.

पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचा आनंद या कलकारांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. तेव्हा लवकरच या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive