शूटिंगला सुरुवात झाल्यावर सुमीने शेयर केले सेटवरचे हे फोटो

By  
on  

लॉकडाउनचं रुपांतर हळूहळू अनलॉकमध्ये होत असताना आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही सुरुवात होत आहे. सरकारने दिलेल्या परवानगी आणि नियमांनुसार आता चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. त्यातच प्रसिद्ध मालिकांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेचही चित्रीकरण नुकतच सुरु करण्यात आलं. यावेळी चित्रीकरणाचा श्रीगणेशा करत कामाला सुरुवात करण्यात आली.


यावेळी सेल्फ डिस्टंसिंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचं पालन करण्यात आलं. या सेटवरील काही फोटो अमृताने पोस्ट केले आहेत. यात मेकअप आर्टिस्ट पीपीई किट घालून मेकअप करताना दिसत आहेत. शिवाय क्रू मेंम्बर्सनेही विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळतय.

या पोस्टमध्ये अमृता लिहीते की, "गणपती बाप्पा मोरया...असं म्हणत आम्ही आजपासून शूटिंगला सुरुवात केली. असंच प्रेम राहू द्या मिसेस मुख्यमंत्री वर."


 

 

Recommended

Loading...
Share