‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, सेटवर अशी घेतली जात आहे काळजी

By  
on  

लॉकडाउनच्या काळात जवळपास तीन महिने मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. आणि सगळ्या प्रकारचे चित्रीकरण बंद झाले. मात्र आता सरकारच्या परवानगीनंतर चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होत आहेत. लॉकडाउनच्या काळात काही मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिका पाहाव्या लागत होत्या, आता मात्र नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील.


यात आता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेचाही समावेश आहे. नुकतीच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

मात्र मालिकेच्या सेटवर सोशल डिस्टंसिंगसह इतर नियमांचही पालन केलं जात आहे. शिवाय संपूर्ण क्रू हे मास्क आणि सॅनिटायझरचाही वापर करत आहेत.

यावेळी या सेटवर मालिकेतील कलाकारांसह इतर क्रू मेम्बर्सही उपस्थित होते. मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करत या मालिकेच्या टीमने कामाला सुरुवात केली आहे.

Recommended

Loading...
Share