लॉकडाउनच्या काळात टेलिव्हीजनवर मालिकांचे जुने भाग तर काही जुन्या प्रसिद्ध मालिका पाहायला मिळाल्या. या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झाल्यानं सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद झाले होते. मात्र आता सरकारच्या परवानगी नंतर चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होत आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील काही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच लॉकडाउनमध्ये 'आठशे खिडक्या नऊशे दारं' ही नवी मालिका त्यांनी प्रेक्षकांंच्या भेटीला आणली. ज्याचं चित्रीकरण आपआपल्या घरातच कलाकारांनी केलं. मात्र आता चित्रीकरण सुरळीत झाल्यानंतर या वाहिनीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग आता येत्या 13 जुलैपासून प्रसारीत करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. याविषयीची पोस्टही त्या्ंनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून दिली.
तेव्हा येत्या 13 जुलैपासून या आवडत्या मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.