By  
on  

पाहा Photos : शिवाने मालिकेतील हा सीन पोस्ट करून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

'जीव झाला येडापिसा' ही प्रेक्षकांची आवडती मालिका लवकरच पुन्हा भेटीला येत आहे. लॉकडाउनमध्ये या मालिकेचे जुने भाग पाहायला मिळत होते. मात्र आता लवकरच नव्या भागांसह ही मालिका पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

 

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालिकेतील शिवा म्हणजेच अशोक फळदेसाईने मालिकेतील आषाढी एकादशीच्या भागाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात शिवा आणि सिद्धी पाहायला मिळत आहेत. शिवा विठू नामाच जयघोष करत टाळ वाजवत आहे. तर सिध्दी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन उभी असलेली दिसत आहे. 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अशोकने हे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. सोशल मिडीयावर आज विठूनामाचा जयघोष सुरु असल्याचं पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive