मास्क आणि रमाबाई, या मालिकेच्या चित्रीकरणालाही झाली सुरुवात

By  
on  

मनोरंजन विश्वातील कामाला आता हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. सरकारच्या परवानगीनंतर आणि नियमांचं पालन करत आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष करून मालिकाचे चित्रीकरण हळूहळू सुर होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 

या मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारणारी शिवानी रांगोळेही आता चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली आहे. मात्र सेटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचही चित्र पाहायला मिळालं. नुकतच शिवानीने सेटवरील एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. यात ती रमाबाईंच्या लुकमध्ये मास्क घातलेली दिसत आहे. हे सगळे कलाकार नियमांचं पालन करत आणि विशेष काळजी घेत चित्रीकरण करत असल्याचं हे चित्र आहे.

लवकरच या चित्रीकरण सुरु झालेल्या मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

Recommended

Loading...
Share