'मिसेस मुख्यमंत्री'च्या सेटवर सुमी आणि समरचं असं सुरु आहे ट्विनिंग

By  
on  

जवळपास तीन महिन्यांनी मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलेले कलाकार आनंदी आहेत. त्यांचा हा आनंद ते सोशल मिडीयावरही व्यक्त करताना दिसत आहेत.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेचही चित्रीकरण नुकतच सुरु झालं आहे. तेव्हा समर म्हणजेच तेजस बर्वे आणि सुमी म्हणजेच अमृता धोंगडे हे कलाकार सेटवर पोहोचले आहेत. सेटवरील काही फोटो हे कलाकार सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. समर आणि सुमीचं ऑनस्क्रिन जशी छान केमिस्ट्री पाहायला मिळते तसच ऑफस्क्रिनही त्यांची मैत्री आहे. नुकताच तेजसने दोघांच्या कॉफी मग ट्विनिंगचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "ते मूर्ख आहेत जे एकावर एक मोफत विकत घेत नाहीत. आणि ते हुशार आहेत जे त्याला ट्विनिंग फन असं म्हणतात, एवढे जाड झालो तरी बेहत्तर... ! कॉफी पायज्जे."

 

तेव्हा या मालिकेचही चित्रीकरण सुरु झालं आहे आणि कलाकारांची सेटवरील धमाल सुरु झाली आहे. तेव्हा या मालिकेचेही नवे भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Recommended

Loading...
Share