By  
on  

अंजलीबाई येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, सेटवर अशी घेतली जात आहे काळजी

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. जवळपास तीन महिने कोणत्याच प्रकारचं चित्रीकरण झालं नाही. त्यामुळे कलाकार आणि मनोरंजन विश्वात काम करणारे सगळेच घरातच होते. मात्र आता सरकारच्या परवानगी नंतर हळूहळू चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिध्द मालिकेच्या चित्रीकरणालाही कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. 

नुकताच झी मराठी वाहिनीने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अंजलीबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर या मालिकेच्या सेटवर असल्याचं पाहायला मिळतय. सध्या सुरक्षिततेची कालजी घेऊन आणि नियमांचं पालन करून कशाप्रकारे चित्रीकरण सुरु आहे याविषयी ती सांगतेय. या सेटवर सगळ्या नियमांचं पालन करत चित्रीकरण करण्यात येत असल्याचं ती सांगते. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतली जात आहे हे देखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळतय. 

 

लवकरच येत्या 13 जुलैपासून या मालिकेचेही नवे भाग प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याच काय तर या वाहिनीवरील बहुतांश मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. जवळपास तीन महिन्यापेक्षा जास्त काळ प्रेक्षक जुने भाग आणि जुन्या मालिका पाहत होते. आणि आता लवकरच नव्या भागांची मेजवानी त्यांच्यासमोर येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive