नुकतची मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच पावसाच्या सरीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सेटवर चित्रीकरणासाठी रूजू झालेले कलाकार पावसाचाही आनंद लुटत आहेत.
‘माझा होशील ना’ या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सध्या पावसाचा जोर काही दिवस कायम आहे. त्यामुळे सेटवर पावसाचं पाणी साचलं आहे. आणि या साचलेल्या पाण्यात हे दोघही या पावसाचा आनंद लुटत आहेत.
कधी पावसाच्या सेटवर साचलेल्या पाण्याजवळ टायटॅनिक सिनेमाचं गाणं म्हणतात तर कधी पाण्यात कागदी होडी सोडतात. आधीच चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने आनंदी असलेल्या कलाकारांचा हा आनंद पावसामुळे गगनात मावेनासा झाला आहे.
विराजस आणि गौतमी सेटवर अशाप्रकारे मॉन्सूनचा आनंद घेत आहेत. शिवाय सेटवर इतर गोष्टींचीही काळजी घेतली जात आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून या मालिकेचं चित्रीकरण केलं जात आहे.