By  
on  

प्रेक्षकांना हसवण्यासाठी विनोदवीर असे झाले सज्ज, सेटवरील हे फोटो आले समोर

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची टीम सज्ज झाली आहे. नुकतीच या विनोदी कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांच्यासह कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगेड, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि पूर्ण टीम नुकतीच सेटवर पोहोचली आहे.

जवळपास तीन ते चार महिन्यांनी सेटवर आल्याने हे विनोदवीर प्रचंड आनंदी झाले आहेत. आणि आता प्रेक्षकांना हसवण्यासाठी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. येत्या 13 जुलैपासून चला हवा येऊ द्याचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

मात्र लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळातही या कार्यक्रमाच्या जुन्या भागांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आणि आता हे नवे भाग घेऊन येण्यासाठी हे विनोदवीर कामाला लागले आहेत. शिवाय सेटवर नियमांचं पालन करून, सुरक्षिततेची काळजीही घेतली जात आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive