By  
on  

'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर कलाकारांनी घातले हे असे मास्क

माझा होशील ना मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. हळूहळू मनोरंजन विश्वातील आणि विशेषकरून टेलिव्हीजन विश्वातील चित्रीकरण सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या 13 जुलैपासून टेलिव्हीजनवर काही मालिका आणि कार्यक्रमांचे नवे भाग पाहायला मिळणार आहेत. 

सेटवर इतक्या महिन्यांनी चित्रीकरणासाठी पोहोचलेले कलाकार मात्र प्रचंड आनंदी आहेत. त्यांनी पुन्हा कामाला नव्या जोमाने सुरुवात केली आहे. त्यातच सेटवर पुन्हा धमालही सुरु झाली आहे. माझा होशील ना मालिकेच्या सेटवर तर चक्क मालिकेचं नाव असलेले मास्क या कलाकारांनी घातले आहेत. मग हे मास्क घालून सेल्फी आणि फोटो काढण्याचा आनंदही यांनी अनुभवला आहे. या फोटोंमध्ये या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत.

चित्रीकऱण पुन्हा सुरु झाल्याने मालिकांच्या सेटवर आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे, शिवाय नियमांचं पालन करत इतर काळजीही घेतली जात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive