By  
on  

पाहा Video : 'डॉक्टर डॉन' मालिकेच्या सेटवर अशी घेतली जात आहे काळजी

मनोरंजन विश्वातील मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून टेलिव्हीजनवर आजपासून मालिकांचे नवे भाग पाहता येणार आहेत. डॉक्टर डॉन या मालिकेच्या चित्रीकरणालाही काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून या मालिकेचेही नवे भाग प्रेक्षकांना पाहता येतील.

मात्र नुकतीच या मालिकेच्या चित्रीकरणाची जागा बदलली आहे. मालिकेत दाखवण्यात येणारं हॉस्पिटल हे कोरोना सेंटर म्हणून वापरलं जात असल्याने हा बदल करण्यात आला आहे. मात्र मालिकेच्या नव्या सेटवरही सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करून काळजी घेतली जात आहे.

 

सेटवर जागोजागी सॅनिटायझर आणि पीपीई किट घातलेले क्रू मेंम्बर्स पाहायला मिळत आहेत. शिवाय कलाकारांचा मेकअप आणि हेअर करणारी टीमही पीपीई किट घालून काम करत असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतय. सेटवरील चित्रीकरणाचं वातावरण बदललं असल्यानं कलाकारांना वेगळेपण जाणवत असलं तरी चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाल्याने कलाकार आनंदी आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive