By  
on  

'मिसेस मुख्यमंत्री' मधील समर म्हणतोय "आम्ही परत आलोय"

टेलिव्हीजन विश्वातील काही मालिकांच्या नव्या भागांना नुकतीच सुरुवात झाली आहे. गेली काही महिने लॉकडाउनच्या परिस्थितीत टेलिव्हीजनवर जुन्या मालिका, मालिकांचे जुने भाग पाहायला मिळत होते. मात्र आता नव्या भागांसह विविध वाहिनींनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे.

मिसेस मुख्यमंत्री या लोकप्रिय मालिकेच्या नव्या भागांनाही नुकतीच सुरुवात झाली आहे. यातच या मालिकेत समरची भूमिका साकारणारा अभिनेता तेजस बर्वेने नुकतीच एक पोस्ट केली आहे. त्याने समर आणि सुमीचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे. सोबतच कॅप्शन लिहीलय की, "आम्ही परत आलोय. ओहा हा लुक ? आजचा एपिसोड पाहावा लागेल त्यासाठी"

 

असं म्हणत त्याने आजच्या एपिसोडमध्ये काहीतरी नवं पाहायला मिळणार असल्याचं सांगीतलं. या पोस्टमधील फोटोत समर आणि सुमीचा हा लुक आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. तेव्हा समर आणि सुमीच्या आयुष्यात आज नेमकं काय घडणार हे आजच्या भागातून समोर येईलच.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive