By  
on  

 लॉकडाऊनच्या काळातही या मालिकेत आऊटडोअर सिन्सची अशी मिळणार मेजवानी 

जवळपास तीन ते चार महिन्यांनंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लॉक़डाउन सुरु झाल्यापासून मनोरंजन विश्वाचं काम बंद असल्याने चित्रीकरमही बंद होती. आता शासनाच्या नियमांचं पालन करून पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र यातही सोशल डिस्टंसिंग आणि इनडोअर शुटिंगची काही बंधने आहेत. या कडक नियमांमुळे आणि खबरदारीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर आणि एकत्र जमण्यावर अजूनही मर्यादा आहेत.  यात शासनाने अद्याप सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्यास परवानगी दिलेली नाही. अश्या वेळी मालिकांमधे सतत घरातलेच प्रसंग दिसण्याची शक्यता आहे. मात्र प्रेक्षकांसाठी वेगळेपण घेऊन येण्यासाठी ‘माझा होशील ना’ मालिकेत काही आउटडोअर सीन दिसणार आहेत.

 झी मराठी वाहिनीवरील ह्या मालिकेने य़ावर एक तोडगा शोधला काढला आहे. सई आणि आदित्यची प्रेमकथा रंगत असताना, दोघांनी एकमेकांना भेटण्यासाठी शहराजवळच्या एका टेकडीवरची जागा निवडली आणि तिथून रात्रीच्या वेळी शहराच्या चमचमणा-या दिव्यांचा अनुभव घेतला.

मात्र या सीनसाठी बाहेर जाऊन चित्रीकरण करणे शक्य नव्हतं. मात्र प्रेक्षकांना हा अनुभव देण्यासाठी मालिकेच्या टिमने आधुनिक तंत्राचा वापर केला  आणि रात्रीच्या वेळच्या शहराजवळच्या टेकडीचा अनुभव सादर केला आहे.

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडेवर चित्रीत हा भाग येत्या शनिवारी 18 जुलैला  प्रसारित होणार आहे. घरबसल्या निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवरुन शहर पाहण्याचा अनुभव आणि सई-आदित्यची रंगत जाणारी प्रेमकथा यात पाहायला मिळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive