By  
on  

पाहा Video : अभिनेता विराजसला सेटवर गौतमीची झाली कटकट, असा लुटला पावसाचा आनंद

नुकतची मालिका विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विविध मालिकांचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. मात्र यातच पावसाळा देखील सुरु झाला असल्याने सेटवर पावसाची मजा कलाकारांना लुटता येत आहे.

'माझा होशील ना' या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या सेटवर कलाकार पावसाचाही आनंद लुटताना दिसत आहेत. शिवाय सुरक्षिततेच्या नियमांचेही पालन करत आहेत. मात्र ब्रेक टाईममध्ये मालिकेतील मुख्य कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची ऑफस्क्रिन मस्तीही सुरु असते. नुकताच विराजसने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. 

या व्हिडीओत सेटवर कोसळणारा पाऊस आणि गौतमी देशपांडेची मस्ती पाहायला मिळतेय. या व्हिडीओला त्याने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "पावसाचा त्रास आणि त्यात गौतमी देशपांडेची कटकट..."

 

या दोघांची या मालिकेतील ऑनस्क्रिन केमिस्ट्री पसंत केली जात आहे. शिवाय आता दोघांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री देखील सोशल मिडीयावर चाहत्यांना आवडत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive