पाहा Photos : या मालिकेच्या सेटवर असे पाळले जात आहेत सुरक्षिततेचे नियम, चित्रीकरणाला सुरुवात

By  
on  

शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आता मालिका विश्वातील चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मात्र मालिकांच्या सेटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची काळजी घेतली जात आहे.

'हे मन बावरे' या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या सेटवरही कलाकार आणि मालिकेची टीम विशेष काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतय. नुकतच कलर्स मराठी वाहिनीने सोशल मिडीयावर या मालिकेच्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. या मालिकेतील मुख्य कलाकार मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरही सेटवर नियमांचे पालन करून काळजी घेत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने आणि सेटवर परतल्यानंतरचा आनंद या कलाकारांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय.

य़ात असं लिहीलय की, "शुटिंग दरम्यान कलाकार आणि तंत्रज्ञ सोशल डिस्टंसिंग पाळून आरोग्याची योग्य दक्षता घेत आहेत, कारण तुमचं 'मन बावरं' करण्यासाठी तुमच्या लाडक्या मालिका नव्या जल्लोषात येत आहेत."

 

तेव्हा लवकरच या मालिकेचेही नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 

 

Recommended

Loading...
Share