'जीव झाला येडापिसा' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. नुकतीच या मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या मालिकेत अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुले हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
नुकतीच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने कलाकार आनंदी आहेत. शिवाय पावसाळाही सुरु झाला आहे. यातच सेटवर पावसाचा आनंदही हे कलाकार लुटत आहेत. नुकताच अशोकने सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. त्याने विदुलासोबतचा हा सेल्फि पोस्ट केला आणि लिहीलं की, "माझ्या पार्टनर इन क्राईमला भेटा."
तेव्हा जशी यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आहे तशी ऑफस्क्रिन यांची चांगलीच मैत्री पाहायला मिळतेय. हातात छत्री असतानाही दोघं थोडे भिजलेले आणि पावसाचा आनंद घेत असल्याचं या फोटोत दिसतय. दोघंही सध्या सेटवर पावसाचा आनंद लुटत चित्रीकरण करत आहेत.