शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्यात तयारझालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणाया अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत.
घरच्यांचा विरोधात जाऊन आणि देवयानीसोबत असलेले नाते तोडून शौनकने मंजूसोबत लग्नाचा ठोस निर्णय घेऊन तो संपूर्ण जबाबदारीने पूर्ण करुन मंजूशी लग्न केल्यामुळे देवयानीच्या मनात राग आणिअस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता आणि विश्वासघात झालेल्याची भावना देवयानीला शांत बसू देणार नाही आणि याचाच बदला घेण्यासाठी देवयानी वेगवेगळ्या मार्गाने शौनक-मंजूच्या संसारातलुडबूड करुन मंजूला मानसिक त्रास देण्याच्या विचारात आहे/प्रयत्नात आहे.
सौभाग्यवतींसाठी प्रेमाचे प्रतिक हे मंगळसूत्र असते. मंगळसूत्रामुळे त्यांचे सौंदर्य अजून जास्त खुलून दिसते. पण या दागिन्याचा वापर देवयानी मंजूला त्रास देण्यासाठी कसं करते हे या मालिकेत पाहायलामिळणार आहे. शौनकच्या नावाचं मंगळसूत्र देवयानी घालते आणि नात्याने बायको असलेल्या मंजूला शौनकच्या नावाचं मंगळसूत्र घालायचे आहे पण यात तिचं काही चुकतंय का असा प्रश्न तिच्या मनातउपस्थित झाला आहे. यात मंजूचं काहीही चुकत नसून मंगळसूत्र नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक आहे. प्रेम नसलेल्या नात्यात हे कुरुप दागिन्यासारखं आहे, अशा प्रेमळ शब्दाने तिची समजूत काढूनशौनक मंजूला मंगळसूत्र भेट म्हणून देतो आणि हा क्षण मंजूसाठी आनंदाचा क्षण ठरतो.
या दोघांच्या नात्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांसाठी नेहमी एकत्र येणा-या मंजू आणि शौनकच्या नात्याची लव्हस्टोरीचा एक तासाचा विशेष भाग १६ फेब्रुवारीला नक्की पाहा सोनीमराठीवर.
.....