मिताली-सुयशचं ‘हॅशटॅग प्रेम’, पहिल्यांदाच झळकणार एकत्र

By  
on  

 एक नवीकोरी प्रेमकहाणी  ‘हॅशटॅग प्रेम’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा सिनेमा आजच्या काळातील असेल. सोशल मिडीया आणि हॅशटॅग जमान्यातील प्रेमकहाणी  या सिनेमात पाहायला मिळेल. अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री मिताली मयेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतील. तेव्हा दोघांच्या या फ्रेश जोडीची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळेल. 


  ‘हॅशटॅग प्रेम’ची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून आघाडीचे संगीतकार प्रविण कुवर यांनी या सिनेमातील गीतांना सहजसुंदर संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केलं असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचं आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षकांना पहायला मिळणार असून महेश भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी “माऊली फिल्म प्रोडक्शन’’च्या बॅनरखाली बनवलेला हा सिनेमा वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या “पिकल एंटरटेनमेंट’’च्या सहकार्याने सिनेरसिकांसमोर प्रस्तुत केला जाणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी ‘हॅशटॅग प्रेम’च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दिग्दर्शक राजेश जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा सर्वांर्थानं आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा आहे. 

Recommended

Loading...
Share