By  
on  

पाहा Video : 'सोपं नसतं काही' वेबसिरीजच्या निमित्ताने शशांक, अभिजीत आणि मृण्मयी सांगतायत हा किस्सा

सोपं नसतं काही या आगामी वेबसिरीजच्या निमित्ताने एक वेगळा विषय पाहायला मिळणार आहे. प्रेमाचं त्रिकूट एका वेगळ्या कथेसह पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर आणि शशांक केतकर हे कलाकार या सिरीजच्या निमित्ताने एकत्र झळकतायत. या सिरीजमधून हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकतायत. या सिरीजच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने या कलाकारांसोबत खास बातचीत केलीय. यावेळी या सिरीजचा विषय आणि बऱ्याच गोष्टी या कलाकारांनी सांगितल्या. यावेळी या तिघांनी पिपींगमूनसोबत खास खेळही खेळला.

अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची खऱ्या आयुष्यात चांगली मैत्री असल्याने या मैत्रीविषयी दोघे बोलते झाले. मृण्मयीविषयी अभिजीत की शशांक दोघांपैकी कुणाला जास्त माहिती आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक रंजक गोष्टी समोर आल्यात. 

या वेबसिरीजचा वेगळा विषय असल्याने प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया मिळतील हे तिघांसाठी औत्सुक्याचं असल्याचही त्यांनी सांगितलं.

Recommended

PeepingMoon Exclusive