प्रेमापेक्षा नातं महत्वाचं...कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलीय. सर्वात महत्त्तवाची गोष्ट म्हणजे हा मचअवेटेड सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या अगोदर स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल. रविवार १४ मेला दुपारी १ वाजता घरबसल्या प्रेक्षकांना या अनोख्या लव्हस्टोरीचा आनंद घेता येईल. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा नवाकोरा सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी स्टार प्रवाहवर प्रदर्शित होत आहे.
ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या सिनेमाविषयी सांगताना म्हणाले, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे . जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय.’
तेव्हा पाहायला विसरु नका ऑटोग्राफ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार १४ मेला दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.