आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुध्द देशमुख फेम अभिनेते मिलींद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांच्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
मिलींद गवळी यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. आपल्या अभिनय प्रवासाबद्दल ते नेहमीच व्यक्त होत असतात. नुकतंच लहान मुलांसोबत त्यांच्या कलाने कसं शुटींग करताना आगळा-वेगळा अनुभव येतो, हे त्यांनी पोस्टमधून मांडलं आहे.
मिलींद गवळी यांची पोस्ट
शूटिंग मध्ये सगळ्यात कठीण काम का असेल तर लहान बाळांबरोबर ,लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणं सगळ्यात कठीण असतं ,
खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घ्यायचं असतं हे त्यांना माहितीच नसतं,
माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला,
माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमांमध्ये काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.
एकदा जया बच्चन यांची production ची एक सिरीयल “सात फेरे” नावाची , त्यात मी काम करत होतो, एक छोटीशी सहसा वर्षाची मुलगी जिने मराठी मध्ये “कळत नकळत” नावाचा चित्रपट केला होता, ती काम करत होती, मदन बावरिया नावाचे कुणीतरी डायरेक्टर होते, डायलॉग व्यवस्थित बोलता येत नाहीत म्हणून ते तिला इतके ओरडले , की ती मुलगी ओक्सबुकशी रडायला लागली, त्या डायरेक्टरनी त्या मुलीला काढून टाकले, देबू देवधर त्या सिरीयलचे कॅमेरामन होते, मग त्यांची लेक सई तिला बोलवण्यात आलं, सई पण लहान होती , तिचे बाबाचं कॅमेरामन होते , त्याच्यामुळे तिच्यावर काही त्या डायरेक्टरला ओरडता वगैरे आलं नाही. गपचूप सईचं सगळं त्यांना ऐकावं लागतं होत, तिच्या कलानी घ्यावं लागत होतं, ते बघून मला फार आनंद झाला होता.
असे खूप बरे वाईट अनुभव आहेत पण
आमच्या “आई कुठे काय करते “ च्या सेटवर आमची जी त्वीशा Twisha आहे,
तिच्या बरोबर आमचं डिरेक्शन डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट इतक्या छान पद्धतीने तिचं शूटिंग करतात, हे बघून मला फार आनंद आणि त्यांचं कौतुक करावंसं वाटतं, त्विशा चे झोपायचे सीन असेले तर तिच्या झोपेच्या वेळीत ते शूट केले जातात,
ती जागी असेल ,हसत खेळत असेल , तर मग बाकीचे शूटिंग थांबून तिचं शूटिंग केलं जातं, तिचा मूड नसेल तर मघ नाही च करत शूटिंग. रवी सर @ravikarmarkar , सुबोध @baresubodh आणि तुषार @tusharvichare तुमचं खरंच खूप कौतुक आहे.
तुषार त्विशा बाळा खेळतांनाचा बी टी एस चा व्हिडिओ मी जो share केला आहे.
त्याच्याने अंदाज येईल की तिच्याबरोबर कसं शूटिंग करतात..
मला तर अनिरुद्ध चे सीन करून जितकं स्ट्रेस आणि प्रेशर येतं ते त्विशा कडे बघितलं की सगळं निघून जातं आणि चेहऱ्यावर एक smile आणि मन प्रसन्न होऊन जातं.
@raju_chiluka31 Thank you for the video..