पाहा Video : अभिनेता गश्मीर महाजनीची पहिली वेबसिरीज 'श्रीकांत बशीर'चा फर्स्ट लुक रिलीज

By  
on  

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज एकामागोमाग एक रिलीज होताना दिसत आहेत. यात विविध जॉनर आणि प्रेक्षकांचे आवडते कलाकार पाहायला मिळत आहेत. यातच एक नवा एक्शन ड्रामा घेऊन येत आहे 'श्रीकांत बशीर' ही नवी वेब सिरीज.

अभिनेता गश्मीर महाजनीची ही पहिलीच वेब सिरीज आहे. या वेब सिरीजच्या निमित्ताने गश्मीरने सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून गश्मीरने त्याच्या या वेबसिरीजचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आणला आहे. ही एक क्राईम एक्शन थ्रिलर सिरीज असून यात दोन गुप्तचर अधिकारी आहेत जे एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत. श्रीकांत आणि बशीर अशी त्यांची नावे आहेत. बशीरच्या भूमिकेत आहे ऋषि नेगी आणि श्रीकांतच्या भूमिकेत गश्मीर महाजनी. मात्र जेव्हा एका व्हायरसपासून शहराला वाचवायचं असतं तेव्हा मात्र दोघं मिळून यात लढा देतात. 

 

 यासह या सिरीजमध्ये मंत्रमुग्ध, युधीष्टीर सिंह, अश्मिता जग्गी, पूजा गोर, कुणाल पंत हे कलाकार आहेत. येत्या 11 डिसेंबरला ही बेव सिरीज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share