ऋषी सक्सेना आणि खुश्बू तावडेची लव्हेबल केमिस्ट्री दिसणार 'गुड बॉय' वेबसिरीजमध्ये

By  
on  

मुलींच्या मागे असलेल्या आणि तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट गुडबॉय या मराठी वेब सीरिजमधून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली असून हंगामा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहायला मिळणार आहे.

या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना,  खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरं  वेब सीरीज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सीरिजची वैशिष्ट्यं आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hungama Play (@hungama_play)

Recommended

Loading...
Share