जुई आणि साकेत पुन्हा परतणार, उमेश कामतने शेयर केला 'आणि काय हवं 3' च्या सेटवरील फोटो

By  
on  

आणि काय हवं या वेब सिरीजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही रियल लाईफ जोडी वेब विश्वात रिल जोडी म्हणून झळकली. या सिरीजची कथा, उमेश-प्रियाची जोडी आणि सिरीजचे प्रत्येक भाग लक्षवेधी ठरले. त्यामुळे पहिल्या सिरीजच्या यशानंतर या सिरीजचं दुसरं पर्वही प्रदर्शित करण्यात आला. या दोन्ही सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता लवकरच या सिरीजचं तिसरं पर्व म्हणजेच तिसरं सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

साकेत आणि जुईच्या भूमिकेत उमेश आणि प्रियाची जोडी चांगलीच जुळून आली. त्याचा सुखी संसार, त्यात येणारे अडथळे, गमती जमती या सहज सुंदर पद्धतिने मांडण्यात आल्या आहेत. तेव्हा आता तिसऱ्या पर्वात काय नवं पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

नुकतच अभिनेता उमेश कामतने या सिरीजच्या तिसऱ्या सिझनविषयीची पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सिरीजच्या चित्रीकरणाविषयी म्हटलय. शिवाय सेटवरील फोटोही शेयर केला आहे. तेव्हा आता लवकरच तिसर सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतय. वरुण नार्वेकर लिखित आणि दिग्दर्शित या सिरीजमध्ये आता तिसऱ्या सिझनमध्ये काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेश त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "अखेर.. आणि काय हवं, सिझन 3. शूटींग संपल्यानंतरचे हावभाव..."

सध्याच्या कोरोना काळात अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. उमेश आणि प्रिया या दोघांनीही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन दोघं पुन्हा जोमाने कामाला लागले होते. आता लवकरच या सिरीजच्या निमित्ताने दोघं प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. 
 

Recommended

Loading...
Share