ठरलं तर ! यादिवशी प्रदर्शित होणार 'समांतर - 2' वेबसिरीजचा ट्रेलर, पाहा टीझरची झलक

By  
on  

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'समांतर' या वेबसिरीजनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे या सिरीजमध्ये पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनची उत्सुकता होती. दुसरं सिझन येणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होतीच. यातच आता 'समांतर - 2' विषयी नवी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा आहे या सिरीजच्या ट्रेलरची. 'समांतर -2' या सिरीजचा ट्रेलर येत्या 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली आहे. 

'समांतर - 2' ची स्टारकास्ट आणि टीमने मिळून एक खास पोस्ट शेयर केली आहे. ज्यात समांतर 2 च्या टीझरची झलक दाखवण्यात आली असून यात लवकरच सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं सांगीतलय. 

"दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! पहा पुढे काय घडणार कुमार च्या आयुष्यात, समांतर - 2 मध्ये... ट्रेलर येत आहे २१ जून रोजी!" अशी घोषणा करण्यात आली असून या सिरीजच्या ट्रेलरमध्ये काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कांदबरीवर आधारित ही सिरीज आहे. पहिल्या सिझनमध्ये अपूर्ण राहिलेली कहाणी आता आगामी दुसऱ्या सिझनमध्ये कशी पुढे जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने 'समांतर - 2'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल? हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. त्यामुळे येत्या 21 जूनला प्रदर्शित होणारा ट्रेलर लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.

या सिरीजच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केलं होतं. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज, जयंत सावरकर हे कलाकार या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 

Recommended

Loading...
Share