कुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर

By  
on  

'समांतर' नंतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याविषयी उत्सुकता ताणून धरली होती. याशिवाय दुसऱ्या सिझनमध्ये झळकणारी ती स्त्री कोण आणि कोण अभिनेत्री या भूमिकेत झळकणार  याविषयी चर्चा सुरु होती. अखेर त्या बाईच्या रुपात कोण अभिनेत्री झळकणार हे समोर आलय. नुकताच 'समांतर 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर या सिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकणार असं बोललं जात होतं आणि ते खरं ठरलं. 'समांतर 2' च्या ट्रेलरमध्ये सई ताम्हणकरची झलक पाहायला मिळतेय. सईची झलक पाहुन प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली असेल यात शंका नाही.

'समांतर 2' मध्ये पुन्हा एकदा अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात 'समांतर' सिझन 2 विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. तर आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्मदुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे. यातच ट्रेलरमध्ये सई ताम्हणकरची झलक लक्षवेधी ठरतेय.


 

पहिल्या सिझनमध्ये  कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. आता दुसऱ्या सिझनमध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाजरोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही या गूढ स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीनेआपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का ? याचा शोध 10 भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.

 
'समांतर 2' विषयी स्वप्नील जोशी म्हणतो की,  ''प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन 'समांतर'ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचाअडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शो ने आपलंस केलंय. 'समांतर'चा पहिला सिझन येऊन आता वर्ष उलटले असून मलामाहित आहे की, प्रेक्षक आता सिझन २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सिझन २ मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून यातहा प्रश्न उपस्थित होणार आहे, की जर तुम्हाला तुमचं भविष्य माहित असेल, तर ते बदलणे शक्य आहे का?'' 


 

सुदर्शन चक्रपाणीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज सांगतात की, ''एक अभिनेता म्हणून माझ्या नव्या रुपाला सिझन १ मध्ये खूपचचांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक सुद्धा नवनवीन संकल्पना स्वीकारत आहेत, हे पाहून खूपच छान वाटतंय. एक अभिनेता म्हणून या अनोख्याकथानकाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. चक्रपाणीचे आयुष्य कुमारच्या जीवनाचे प्रतिबिंब होईल, की काही मनोरंजक वळणे घेत कुमारच्याउत्तरांच्या शोधाचे अनुसरण करत राहील ? हे सिझन २ पाहिल्यावरच कळेल.''  


समीर विद्वांस दिग्दर्शित 'समांतर 2' चा थरार हा येत्या 1 जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

Recommended

Loading...
Share