आगामी वेब सिरीज 'परीस'ची पहिली झलक प्रदर्शित, हे कलाकार झळकणार

By  
on  

आगामी काळात विविध विषयांवरील मराठी वेब सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याच वेब सिरीजचे विविध टीझर सध्या प्रदर्शित होताना दिसत आहेत. प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वेब सिरीज प्रदर्शित होतील. यापैकीच एका वेब सिरीजची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आलीय.

'परीस' असं या वेब सिरीजचं नाव असून अंधश्रद्धा, हव्यास, गुन्हा आणि विनाश यावर आधारित आहे. नुकताच या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित झालाय. या वेब सिरीजमध्ये अभिनेता चंद्रकांत राऊत, अविनाश खेडेकर, पायल जाधव, गायत्री बनसोडे, अश्वीन अनेगिरीकर, राजा दगडे, विशाल सांगळे हे कलाकार झळकणार आहेत. मयुर करंबाळीकर, राजा दगडे, विशाल सांगळे यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं असून मयुरचं लेखन आहे. 

 

लवकरच ही सिरीज प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टीझरमधून ह्रदयाचे ठोके वाठवणारी ही कथा जाणवतेय. त्यामुळे ही वेब सिरीज पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share