By  
on  

स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या 'संजीव'ची कहाणी शॉर्टफिल्ममधून उलगडणार, शशांक केतकर प्रमुख भूमिकेत

छोटीशी कथा कमी वेळात दाखवून मंत्रमुग्ध होण्यासाठी आजही प्रेक्षक शॉर्टफिल्म मोठ्या संख्येने पाहिल्या जातात. मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकार या शॉर्टफिल्ममध्ये अभिनय करताना दिसत आहेत. अशीच एक नवी शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'संजीव' हे या शॉर्टफिल्मचे नाव असून अभिनेता शशांक केतकर प्रमुख भूमिकेत झळकत आहे. 

क्रिकेटची आवड असणाऱ्या आणि क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या संजीवची गोष्ट या शॉर्टफिल्ममधून उलगडणार आहे. अभिनेता शशांक केतकर तसेच सध्या चालू असलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील प्रमुख कलाकार तेजस बर्वे या शॉर्टफिल्ममध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 

 

'फ्युजन कॅफे'ची निर्मिती असणाऱ्या 'संजीव'चं लेखन-दिग्दर्शन सौरभ चव्हाण यांनी केलं आहे. चंद्रशेखर वेरळकर यांनी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी युट्यूब वर ही शॉर्टफिल्म प्रदर्शित होणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive