भूमी पेडणेकरला चक्क या अभिनेत्रीच्या घरी मारावा लागला झाडू

By  
on  

नुकतंच भूमी पेडणेकर अभिनीत 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. अलीकडेच तिने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये हजेरी लावली होती. भूमीने ‘दम लगाके हैशा’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला. नेहाच्या शो दरम्यान तिने या सिनेमासाठी घेतलेल्या आठवणी ताज्या केल्या आहेत. भूमी म्हणते, ‘ या सिनेमात अभिनेत्री सिमा पाहावा यांनी माझ्या आईची व्यक्तिरेखा साकारली होती. आम्ही एकत्र खुप काम केलं आहे. 

 

आमची त्रिमुर्ती म्हणजेच मी, आयुष्मान आणि सीमाजी एक सोनेरी त्रिकोण आहे. आम्ही तिघं एकत्र असलेला सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.’ ती पुढे म्हणते, ‘त्या मला ट्रेन करत होत्या. मी पहिल्यादिवशी त्यांना भेटले त्यावेळी त्यांनी मला सलवार कमीज घालून यायला सांगितलं. मी त्यांच्या घरी पोहोचले त्यावेळी त्यांनी माझ्याकडून झाडू मारून घेतला. चहा करायला सांगितलं. जवळपास मी एक महिना हे काम करत होते. त्यावेळी मला ख-या अर्थाने जीवनाची ओळख झाली.

Recommended

Loading...
Share