By  
on  

शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक?

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने सर्वांना आपलंसं करुन टाकलंय. बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर नाव कोरता आलं नसलं तरी त्याने चाहत्यांची मनं जिंकली. हा शो संपून बराच काळ लोटला तरी त्याची सर्वत्र हवा आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

‘बिग बॉस १६’ संपताच शिवकडे नवीन प्रोजेक्टच्या ऑफर्सची रांग लागली आहे. रोहित शेट्टीने त्याला ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाची ऑफर दिली आणि लवकरच तो ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये दिसणार आहे. आता या कार्यक्रमासाठी त्याला किती मानधन मिळणार हे उलगडलं आहे. शिवसुध्दा खतरोंं के खिलाडीसाठी भरपूर तयारी करत आहे. नुकतंच एका मुलाखतीत तो म्हणाला होता, त्याला आगीची नाही पाण्याची जास्त भिती वाटते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वाचा शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे असं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी त्याला ५ ते ६ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दर आठवड्याला तो १० ते १२ लाख रुपये कमावणार आहे. सर्वात ंमोठी रक्कम त्याला ह्यात ऑफर झाली आहे. तो सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक आहे. 

 

चाहते शिवला ‘खतरों के खिलाडी’च्या या सीझनमध्ये पाहण्यासाी उत्सुक ाआहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive