‘तारक मेहता....’ मध्ये या कलाकाराची पुन्हा होणार वापसी, यासाठी घेतला होता ब्रेक

By  
on  

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या खास आवडीची आहे. कौटुंबिक प्रकारात मोडणा-या या डेलीसोपचे चाहते अनेक आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा खास असा चाहता वर्ग आहे. 
या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीमधील सदस्यांसोबतचया मालिकेतील गाजलेलं एक पात्र म्हणजे नट्टू काका. या मालिकेत आता ब-याच दिवसांनी नट्टूकाकांची वापसी होणार आहे. 

 

काही दिवसांपूर्वी नट्टू काका म्हणजेच अभिनेता घनश्याम नायक यांच्यावर सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांनी काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे लवकरच ते मालिकेत दिसणार आहेत.  सेठजी मेरा पगार कब बढाओगे असा प्रश्न विचारणारे नट्टू काका परत येत असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.

Recommended

Loading...
Share