ही खास पोस्ट शेअर करत करीनाने लाडक्या ‘सैफू’ला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

16 ऑक्टोबर 2012 ला सैफ आणि करीनाने लग्नगाठ बांधली. यांच्या लग्नाला आज 8 वर्षं होऊन गेले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने करीनाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टावर करीनाने तिचा आणि सैफचा एक फोटो शेअर केला आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करीना म्हणते, एका वेळेची गोष्ट आहे, बेबो नावाची एक मुलगी आणि सैफू नावाचा एक मुलगा होता. त्या दोघांनाही स्पेगेटी आणि वाईन खुप आवडायची. त्यानंतर ते कायमच आनंदी जीवन जगले. यामुळेच तुम्हाला आनंदी जीवनाची किल्ली सापडली असेल. लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा सैफ अलीखान पतौडी अनंतापर्यंत आणि त्याच्याही पुढे...’  ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती

Recommended

Loading...
Share