या ठिकाणी केली जात आहे चक्क सोनू सुदची पुजा !!!!!

By  
on  

सोनू सुद हे नाव देशाच्या कानाकोप-यात पोहोचलं आहे. लॉकडाऊनमध्येअभिनेता सोनू सुदने अनेक मजुरांना त्यांच्या गावी स्पेशल बस करून पाठवलं होतं. त्यामुळे सोनू सूद हा स्थलांतरित मजूरांचा देवदूत बनला . या कामासाठी सर्वत्रच त्याचं कौतुक झालं. देशभर त्याच्या कार्याचीच चर्चा सुरु होती.  याशिवाय सोनूने अनेक गरीब कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे.

 

 

देशभरातून सोनूच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. सध्या नवरात्र सुरु आहे. नवरात्रीच्या काळात  कोलकातामधील काही चाहत्यांनी तर सोनूचं कौतुक करण्यासाठी दुर्गा मातेच्या मुर्तीसोबत सोनूचा पुतळा देखील उभारला आहे. देवीच्या पुतळ्याप्रमाणेच सोनूच्या पुतळ्याचीही पुजा केली जात आहे. 

 

 

कोलकातामधील  प्रफुल्ल कन्नन वेलफेयर असोसिएशन या संस्थेने यावेळी प्रवासी मजुरांचा देखावा उभा केला आहे. यावेळी त्यांनी सोनू सूदचा देखील एक भला मोठा पुतळा केला आहे. पण देवीच्या पुजेला येणारे अनेक भाविक सोनूच्या पुतळ्याचीही पुजा करताना दिसत आहेत. चाहत्यांचं हे प्रेम पाहून सोनू देखील भावूक झाला आहे. ‘आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार’ असं ट्वीट करत त्याने या भावनांना वाट करून दिली आहे.

Recommended

Loading...
Share