दिवंगत अभिनेता चिरंजीवी सारजाच्या पत्नीने दिला मुलाला जन्म

By  
on  

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाचं 39 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बेंगळूरुमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.  त्यावेळी मेघना राज तीन महिन्यांची गर्भवती होती. बाळाचा जन्म होण्यापुर्वीच त्याचं असं निघून जाणं चाहत्यांसाठी धक्कादायक होतं.

 

 
पण आता चिरंजीवीच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. चिरंजीवी सारजाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मेघनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चिरंजीवीचा भाऊ सुरजने सोशल मिडियावर बाळाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चिरंजीवीच्या फोटोच्या जवळ चिमुकल्याचा फोटो काढला असल्याचे दिसत आहे. यावेळी बाळाच्या रुपाने चिरंजीवी परत आल्याची भावना कुटूंबिय आणि चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Recommended

Loading...
Share