अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या या सिनेमात झळकली होती धकधक गर्ल माधुरी दीक्षित

By  
on  

सध्या लॉकडाउनच्या काळात घरात बसलेली मंडळी  त्यांच्या जुन्या  आठवणींना उजाळा देत आहेत. त्यातच सध्या मनोरंजन विश्वाचं काम बंद आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर आता लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र इतके दिवस घरात बसलेले कलाकार यादरम्यान विविध जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकतीच त्यांच्या करियरमधील एका खास सिनेमाची आठवण करून दिली आहे. या सिनेमात झळकली होती धकधक गर्ल सुपरस्टार माधुरी दीक्षित नेने. 'प्रेम दिवाने' असं या सिनेमाचं नाव आहे. या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होतं. या सिनेमाला नुकतीच 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि याच निमित्ताने सचिन यांनी ही पोस्ट केली आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "माझी हिंदी फिल्म प्रेम दिवाने याच दिवशी प्रदर्शित झाला होता. जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित नेने, पूजा, विवेक यांच्यासोबतच्या  अप्रतिम आठवणी."

 

या सिनेमात जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, पूजा भट, विवेक मुशरन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. सिनेमाच्या सेटवरील एक फोटोही सचिन यांनी या पोस्टसोबत जोडला आहे. 

Recommended

Loading...
Share