Quarantine मध्ये घरबसल्या करा या अभिनेत्यांसारखं कम्फर्ट फॅशनसोबत फोटोशूट

By  
on  

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल ३ मे पर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान, घरात बसून आपण सर्वच कंटाळलो आहोत. वर्क फ्रॉम होम तर तुम्ही करतच आहोत पण मूड फ्रेश नसतो..असं तुमच्या सोबतही होत असेल ना, कारण..खाणं, ऑफीसचं काम करणं, वेबसिरीज-टीव्ही आणि  मग झोपून जाणं. ह्याच रुटीनचा आता वैताग येऊ लागला आहे. 

आम्ही तुम्हाला देतोय एक रिफ्रेशिंग फंडा...तेसुध्दा घरात असलेल्या वस्तूंसह.. घरच्या घरीच एक छोटंस फोटोशूट तुमच्याच मोबाईलने  करा आणि सोशल मिडीयावर मित्र-मैत्रिणींकडून वाहवा मिळवा. लिव्हींग रुममध्ये , घराच्या बाल्कनीत किंवा अगदी टेरेसवर जायला परवानगी असेल तिथे किंवा तुमच्या आवडीच्या घरातल्या कुठल्याही कोप-यात. 

म्हणजेच घरच्या घरी तुम्ही कम्फर्टसाठी या मराठी अभिनेत्यांसारखे आऊट्फिट्स म्हणजे शॉर्टस, टीशर्टस, स्लीव्हलेस-टीशर्ट्स , जॉगर्स जे काही तुमच्या वॉर्डरोबमध्ये उपलब्ध आहे, ते निवडा मस्त ते परिधान करा आणि चिल मारा. मू़ड पण रिफ्रेश होईल, फोटो पण छान येतील सोबतच तुमचं वर्क फ्रॉम होमसुध्दा पूर्ण करु शकता.

खिडकीत किंवा घराच्या बाल्कनीत चहा किंवा कॉफीचा मग हातात घेऊन तुमच्या आवडत्या सॉर्टस व स्लिव्हलेस टीशर्ट मध्ये तुम्ही मस्त फोटोशूट करु शकता. 

घरातला एखादा कोपरा किंवा हॉलपासून किचनपर्यंतच्या लॉबीमध्ये तुम्ही असं झक्कास फोटोशूट करु शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या भावंडांना किंवा आई-बाबांना मस्का लावावा लागेल. 

प्रत्येकाकडे व्हाईटच कलेक्शन असतंच , त्यावर तुम्ही कुठलीही गडद रंगाची शॉर्ट्स थेट मॅच करु शकता. हे आऊटफिट तुम्हाला कुल ड्यूड लुक देऊन जातो.

भन्नाट सेल्फी काढणं हा सुध्दा एक छान ऑप्शन आहे. 

 

लूज जॉगर्स आणि आवडतं स्लिव्हलेस टीशर्ट हातात पुस्तक ...एका परफेक्ट फोटोसाठी आणि काय हवं?

 

होम वर्कआऊट करताना जीम आऊटफिटचे फोटो मस्ट आहेत. 

 

 

पण एकूणच तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधून कम्फर्ट आऊटफिट शोधा आणि घरच्या घरी रिफ्रेशिंग फोटोशूट करुन चिल मारा

Recommended

Loading...
Share