‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. पण प्रेक्षकांना आवडली आहे ती साधी, गोड लतिका.
अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाच्या भूमिकेत दिसते आहे. अक्षया यापुर्वी हिंदी मालिकांमध्ये दिसली होती.
‘ढाई किलो प्रेम’, ‘ ये रिश्ता क्या कहलाता है’, ये रिश्ते है प्यार के’ या मालिकांमध्ये अक्षया दिसली होती.
याशिवाय तिने अनटॅग या वेबसिरीजमध्येही काम केलं आहे.
आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत लतिका सज्जनसोबत लग्न करते की नाही याचा सस्पेंस मात्र कायम आहे.