'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेची हटके प्रेम कहाणी प्रेक्षकांना आवडली. नचिकेत आणि सईच्या प्रेमात विविध अडचणी येत असताना दोघांच प्रेम कसं खुलत जातं हे या मालिकेत पाहायला मिळतं. नुकतच या मालिकेने 400 भाग पूर्ण केले आहेत. या निमित्ताने या मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी खास सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं. यावेळी खास पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला या मालिकेची संपूर्ण टीम हजर होती.
या मालिकेतील अभिनेता निखील दामले, अभिनेत्री गौरी कुलकर्णी, नचिकेतच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांच्यासोबत पिपींगमूनने खास बातचीत केली. यावेळी या कलाकारांनी मालिकेतील त्यांच्या खास मुमेंट्स शेयर केल्या.