By  
on  

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे सांगतोय त्याच्या स्वतःच्या ब्रँड विषयी

शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यानंतर शिव ठाकरे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं झालं. सोशल मिडीयावरही शिवचा मोठा चाहतावर्ग आहे. यातच शिवने स्वत:चं ब्रँड सुरु करायचं ठरवलं, आणि आता शिव ठाकरेने त्याचा स्वत:चा डियोड्रंट ब्रँड सुरु केला आहे. याच ब्रँडचा लाँच सोहळा नुकताच पुण्यात पार पडला.

लवकरच शिव नव्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने यावेळी पिपींगमूनशी बोलताना सांगितलं. शिवाय करियरमध्ये बॅकअप म्हणून हा ब्रँड सुरु केला असल्याचं तो म्हटला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमात शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी चांगलीच गाजली. बिग बॉसच्या घरात दोघांचं प्रेम जुळलं. मात्र चित्रीकरणामुळे वीणा या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकली नसली तरी शिवने वीणाला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या लाँचची झलक दाखवली. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

Recommended

PeepingMoon Exclusive