By  
on  

पाहा Video : अभिनेता अक्षय वाघमारे सांगतोय 'पावनखिंड' सिनेमा चित्रीत करण्याचा थरार

अभिनेता अक्षय वाघमारे पावनखिंड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या पावनखिंड या सिनेमात अक्षयही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या भूमिकेत अक्षय या सिनेमात आहे. नुकताच या सिनेमाचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी पिपींगमून मराठीशी बोलताना अक्षयने सिनेमाच्या चित्रीकरणाचा थरार सांगीतलं.सेटवर साप, विंचू असताना देखील कुणालाच त्याचं भान नसल्याचं अक्षय सांगतो. 

याशिवाय अक्षय हा लवकरच बाबा होणार असल्याचा आनंद त्याने पिपींगमूनसोबत शेयर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive