पाहा Video : या अभिनेत्रीचा साखरपुडा झाल्याच्या होत्या अफवा , 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रुचिरा जाधव सांगतेय असा झाला होता गोंधळ

By  
on  

सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये कधी कधी अनेक गोंधळ होतात. याचीच प्रचिती आली अभिनेत्री रुचिरा जाधवच्या बाबतीत. रुचिराने काही दिवसांपूर्वी काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. ज्यामुळे रुचिरावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. काही ठिकाणी बातम्याही आल्या की रुचिराचा साखरपुडा झाला आहे. तर रुचिराची बहीण ऋतुजाचा साखरपुडा झाला होता. जी रुचिराची बहीण असल्यामुळे थोडीफार तिच्यासारखी दिसते. ज्याने नेटकऱ्यांना वाटलं की रुचिराचाच साखरपुडा झालाय की काय. या सगळ्या गोष्टीत पोस्टमध्ये लिहीलेलं कॅप्शन कुणी वाचलं नसल्याने हा गोंधळ झाला असल्याचं रुचिराने पिपींगमून मराठीशी बोलताना सांगीतलं. या कॅप्शनमध्ये रुचिराने तिच्या बहिणीचं नाव देखील लिहीलं होतं.

नुकतच 'बाबू' या रुचिराच्या आगामी सिनेमाच्या मुहूर्तावेळी रुचिराने पिपींगमूनशी याविषय़ी संवाद साधला. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील रुचिराची भूमिका सध्या लक्षवेधी ठरली आहे.

Recommended

Loading...
Share