पाहा Video : असा असेल अंकित मोहनचा 'बाबू' हा सिनेमा, दिग्दर्शक मयुर शिंदे सांगीतली सिनेमाविषयी ही गोष्ट

By  
on  

'फर्जंद' या मराठी सिनेमातून अभिनेता अंकित मोहन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर 'फत्तेशिकस्त' या सिनेमातूनही त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता बाबू या आगामी सिनेमातून अंकित मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात तो बाबू शेठची भूमिका साकारणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शक मयुर शिंदे यांनी पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी या सिनेमाविषयी माहिती दिली. सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून सिनेमाविषयी जास्त माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

या सिनेमात 90 चा काळ दाखवण्यात येणार असल्याचं यावेळी मयुर यांनी सांगीतलं. अंकितसह या सिनेमात अभिनेत्री गायत्री दातार आणि रुचिरा जाधव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Recommended

Loading...
Share