नायक - खलनायक : संजनाच्या भूमिकेसाठी नकारात्मक प्रतिक्रियेपेक्षा जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळतय - रुपाली भोसले

By  
on  

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील संजना हे पात्र चर्चेत असतं. सुरुवातीपासून खलनायिका असलेल्या या पात्रात विविध छटा आहेत. संजनाचं पात्र टीपीकल विलेन सारखं नाही. अभिनेत्री रुपाली भोसले संजनाचं पात्र साकारतेय. हे पात्र साकारत असताना कोणत्या गोष्टींचा विचार ती करते, या पात्रातील बारकावे काय ? याविषयी तिने पिपींगमून मराठीला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सांगीतलय. नायक - खलनायक सिरीजच्या निमित्ताने संजना या खलनायिकेच्या पात्रातील बारकावे रुपाली भोसलेने यावेळी सांगीतले आहेत. कायम वेगळ्या भूमिकेच्या शोधात असलेल्या रुपालीला नेहमीच काहीतरी वेगळं पात्र साकारण्याची संधी मिळाल्याचं ती सांगते. मुळूमुळू रडणारी पात्रं न करता त्या पात्रात काही वेगळं असेल अशाच पात्रांची निवड रुपाली करत असल्याचं ती सांगते. 

Recommended

Loading...
Share