नायक - खलनायक : 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेता साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे सांगतेय खलनायिका साकारण्याचा प्रवास

By  
on  

रंग माझा वेगळा ही मालिका कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलीय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. मालिकेत बरेच खलनायकही पाहायला मिळतात, मात्र या सगळ्यात दुष्ट आहे ते श्वेताचं पात्र. आपली चुलत बहीण दीपाच्या आयुष्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न श्वेता कायम करताना दिसते. अभिनेत्री अनघा भगरे ही श्वेताची भूमिका साकारतेय. अनन्या नाटकापासून अभिनय क्षेत्रात सुरु केलेला प्रवास ते आता लोकप्रिय मालिकेत खलनायिका साकारण्या प्रवास अनघाने पिपींगमून मराठीच्या 'नायक - खलनायक' सिरीजमध्ये शेयर केला आहे.

सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असलेल्या अनघाकडे मात्र करियरमध्ये प्लॅन बी देखील आहे. अभिनयात काही घडलं नाही तर मिडीया, पी आर, पत्रकारिता असे विकल्पही तिने करियरमध्ये ठेवल्याचं सांगीतलय. आगामी काळात पुन्हा खलनायिका साकारण्याची संधी मिळाल्यास तेही करेल असही ती म्हणतेय. कलाकाराने निवडक न राहता जे काम मिळतय ते मनापासून करावं असही अनघा या मुलाखतीत सांगतेय.

Recommended

Loading...
Share