'महाभारत' या लोकप्रिय पौराणीक मालिकेतील कृष्णा म्हणून लोकप्रिय ठरलेले अभिनेते नितीश भारद्वाज हे पुन्हा एकदा समांतर 2 च्या निमित्ताने सुदर्शन चक्रपाणी या भूमिकेत झळकणार आहेत. येत्या 1 जुलै रोजी 'समांतर 2' ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिझनमध्ये अपूर्ण राहिलेल्या कहाणीत पुढे काय घडेल हे आता दुसऱ्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे. याच निमित्ताने नितीश भारद्वाज यांनी पिपींगमून मराठीसोबत खास बातचीत केली आहे.
यावेळी नितीश भारद्वाज यांनी अनेक वेगळ्या न वाटणाऱ्या भूमिकांसाठी नकार दिला असल्याचं सांगितलं. शिवाय समांतर सिरीजमधील हटके भूमिकेसाठी होकार दिल्याचं सांगताना मी लगेच होकार देत नसल्याचही ते म्हणाले. अभिनेता स्वप्नील जोशीसोबत काम करण्याचा अनुभवही त्यांनी शेयर केला आहे.