'जून' या सिनेमाच्या निमित्ताने एक अनोखी कथा पाहायला मिळतेय. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री नेहा पेंडसे पहिल्यांदाच एकत्र झळकतायत. सुहरुद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलय.
या सिनेमाच्या टीमशी पिपींगमून मराठीने नुकतीच बातचीत केली आहे. जून च्या निमित्ताने नेहा बऱ्याच वर्षांनी मराठीत काम करताना दिसतेय. हिंदी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने नेहा मराठीत झळकत नव्हती. शिवाय मराठीत पुन्हा काम करण्यासाठी वेगळ्या भूमिकेच्या शोधात असल्याचं नेहा म्हणतेय. जून मधून नेहाचा हा शोध पूर्ण झाला. या सिनेमातून नेहा एका हटके भूमिकेत पाहायला मिळतेय.
'जून'ने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवली आहे. प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय.